आमची ओळख



                               मराठी माध्यमाची मान्यताप्राप्त अनुदानित शाळा

सर बैरामजी जीजीभॉय यांनी 1942 साली देणगी म्हणून दिलेल्या भूखंडावरील इमारतीत संस्थेची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, ही माध्यमिक शाळा 1998 पर्यंत भरत होती. पुढे सन 2000 पासून तेथे प्राथमिक शाळा भरू लागली. ही शाळा सुरु करण्यासाठी बैराम एन्. जीजीभॉय यांनी संस्थेला 10 लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या इच्छेनुसार नव्याने सुरू होणाऱ्या प्राथमिक शाळेचे नामकरण ‘डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा’ असे करण्यात आले.
या शाळेला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मान्यता मिळालेली आहे. एप्रिल 2020 पासून शाळेला 100% वेतन अनुदान मिळू लागले आहे. नियमांनुसार शालेय समिती, पालक शिक्षक संघ, अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
शाळेने महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम स्वीकारलेला असून पाठ्यपुस्तकातील काही घटकांसाठी पर्यायी साहित्य वापरण्याची लवचिकता ठेवली जाते. शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण 30:1 आहे.


परिसर आणि सुविधा


प्रवेशद्वार

खेळांगण

बालवयातच मुलांचा सर्वांगाने विकास होण्यासाठी त्यांच्या वयाला अनुरुप अशा खेळांची व्यवस्था वर्गांमध्ये तसेच मैदानात केलेली आहे. या खेळांची आखणी करताना मुलांच्या सुरक्षिततेचा आवर्जून विचार केला जातो. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या दैनंदिन कामात तसेच अध्यापनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा म्हणून त्यांना आवश्यक सुविधाही पुरवलेल्या आहेत.


शिक्षक


पल्लवी शिरोडकर
मुख्याध्यापिका

सानिका सावंत
सहा. शिक्षिका


श्रीमती अदिती घाडीगावकर
सहा. शिक्षिका


सुचित्रा वावेकर
सहा. शिक्षिका


आसावरी पवार
सहा. शिक्षिका


प्राची पानसरे
सहा. शिक्षिका


प्रमिला जगताप
मदतनीस शिक्षिका

शिक्षकेतर कर्मचारी


सुगंधा वाघमारे
लिपिक

निशा राऊत
सेविका
child porno child porno astropay astropay