1998 साली अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेने मंडळाला दिलेल्या देणगीतून 13 संगणक आपल्याला मिळाले आणि त्यामुळे अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे सुरु केले. 2001-02 मधे दिवालीबेन मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या देणगीतून आपल्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर 'श्रीमती कमला मफतलाल मेहता संगणक केंद्राची' स्थापना झाली.सुरुवातीला इ. 8 वी ते इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना संगणक हाताळायला मिळाले. नंतर एक एक वर्ग वाढला आणी इ. 1 ली ते इ. 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी संगणक हाताळायला सुरूवात केली. त्यामुळे सन 2010 ला संगणक केंद्राचे माध्यमिक शाळेच्या तळमजल्यावरील आताच्या मोठ्या जागेत स्थलांतर झाले. त्याच वर्षी संगणकांची संख्याही वाढत गेली. केंद्रात आज एक पूर्णवेळ प्रशिक्षक आहेत. लॅन मधे जोडणी असणारे 48संगणक, स्कॅनर, इंटरनेट, प्रिंटर्स्, Wifi इ. सुविधांनी केंद्र सुसज्ज आहे. शिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक संगणक स्वतंत्रपणे उपलब्ध होतो. या व्यतिरिक्त पूर्व प्राथमिक वप्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी 6 संगणक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांसाठी 10 संगणक तसेच शाळेच्या व मंडळाच्या कार्यालयांसाठी 12 संगणक व 5 लॅपटॉप वापरण्यात येतात. 2 टेलिविजन व 5 प्रोजेक्टर यांचा वापर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जातो. शाळांच्या कार्यालयीन कामांबरोबरच शिक्षकांचे नियोजन, परीक्षांची कामे, मुलांचे रेकॉर्ड इत्यादी कामे संगणकाद्वारे केली जातात. इंटरनेट, गूगल ड्राईव्ह इत्यादींचा वापर नित्य होतो.