4 नोव्हेंबर 2014 च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित झालेला लेख
बदल हवा, पण टप्प्याटप्प्याने
गिरीश सामंत
कार्यवाह,
दि शिक्षण मंडळ, गोरेगाव
आत्तापर्यंत इयत्ता पहिलीतल्या प्रवेशाचं वय पाच वर्ष पूर्ण, असं होतं. शैक्षणिकदृष्ट्या आणि शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींनुसार ते सहा वर्ष असणं आवश्यक होतं. राज्य शासनाने जून 2015 पासून पुढे दर वर्षी पहिलीत प्रवेश घेताना बालकाचं वय 31 जुलैला 5 वर्ष 11 महिने असावं लागेल, असे आदेश काढले. ते आवश्यक असलं तरी प्रवेशाचं वय अचानक एक वर्षाने वाढवल्यास पुढच्याच वर्षी एकाही बालकाला पहिलीत प्रवेश मिळाला नसता. या प्रश्नाचा उहापोह करून उपाय सुचवणारा हा लेख आहे. त्याची दखल घेऊन शासनाने लेखात सुचवलेल्या सर्व सूचना स्वीकारून सुधारित आदेश काढले.
2 जानेवारी 2015 च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित झालेला लेख
शिक्षक अतिरिक्त होतातच कसे?
गिरीश सामंत
कार्यवाह,
दि शिक्षण मंडळ, गोरेगाव
तुकड्यांची संख्या, सरासरी पटसंख्या, विषयनिहाय आठवड्याच्या तासिका, विद्यार्थ्यांसाठी अध्ययनाचे घड्याळी तास, शिक्षकांचे प्रत्यक्ष अध्यापनाचे तास इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळेतील शिक्षकांची संख्या ठरवण्याची पद्धत स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहे. ते निर्णय 1981 च्या सेवाशर्तींनुसार आणि माध्यमिक शाळा संहितेनुसार रीतसर घेतले जात असत. 2009 ला मंजूर झालेल्या शिक्षणहक्क कायद्याने 30 विद्यार्थ्यांमागे किमान एक शिक्षक असावा, अशी जादा अट नव्याने घातली. राज्यसरकारने मात्र किमान एक ऐवजी कमाल एक शिक्षक असा त्याचा अर्थ आपल्या सोयीसाठी लावला. त्यामुळे सर्व शाळांमधील सुमारे 25 ते 30 टक्के म्हणजे सतरा हजारपेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरले. सरकारच्या या सारारसार चुकीच्या निर्णयासंबंधी लिहिलेला हा लेख आहे.