एखाद्या गावातल्या काही लोकांनी एकत्र येत गावातल्या मुलांसाठी शाळा सुरू करणं, ही त्या काळी तशी साधारण घटना.
पण १९४० मध्ये गोरेगावात घडलेली ही घटना 'साधारण' राहिली नाही. पातकर गुरुजींच्या पुढाकाराने उभारलेली आणि प्रभू सरांनी घडवलेली
'अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल' ही शाळा गोरेगावची ओळख बनली. 'अभि' हे लोकांनी दिलेलं लाडकं नाव अभिमानाने मिरवत राहिली.
पुढल्या पिढीमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे, तर सामाजिकताही पेरत विद्यार्थ्यांमधून चांगले नागरिक घडवत राहिली ... अजूनही घडवते आहे!
संपादन : वैशाली रोडे
प्रकाशन : ग्रंथाली
गोरेगावातली एक नावाजलेली शिक्षण संस्था प्रवाहाविरुद्ध जात, मराठी मुलांचा लोंढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे धावत असताना १९९६ मध्ये
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक अशा दोन मराठी माध्यमाच्या शाळा काढण्याचे ठरवते ..........
१९९९ मध्ये शाळा सुरू होतात. मुलांचं वागणं, मुलांचं शिकणं, मुलांचे स्वभाव, मुलांचे विभाव समजून घेत पुढे जात राहतात.
प्रयोग करत राहतात. त्याला मिळणारे मुलांचे आणि पालकांचे प्रतिसाद आणि अर्थात, घेतलेले धडे, यांतून समृद्ध होत डोसीबाई जीजीभॉय बालविहार
आणि प्राथमिक शाळा आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतात. त्या सुंदर प्रवासाची ही गोष्ट ........
संपादन : वैशाली रोडे
प्रकाशन : ग्रंथाली
600 रुपयांचा दोन पुस्तकांचा संच खास सवलतीत 400 रुपये किमतीत शाळेत उपलब्ध (संपर्क : तृप्ती आजगावकर - 9004433382, संदेश पवार - 9324257080)