■ मुलांसाठी-मुलींसाठी एकच गणवेश
पोपटी टी शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅंट
■ सोमवार ते शुक्रवार वरीलप्रमाणे गणवेश आणि शनिवारी गणवेशाव्यतिरिक्त कपडे
1) शाळेच्या येण्याजाण्याच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. शाळा सुटल्यानंतर मुलाची जबाबदारी पू्र्णतः पालकांची राहील.
2) कोणत्याही कारणास्तव मूल गैरहजर राहिल्यास पालकांनी शाळेला लेखी कळवावे. आजारपणामुळे चार दिवसांपेक्षा जास्त दिवस मूल गैरहजर असेल तर लेखी अर्जासोबत डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
3) आजारपणाव्यतिरिक्त इतर कारणाने शाळेत हजर राहता येणार नसेल तर आगाऊ लेखी अर्ज करावा लागेल.
4) पालक सभा, कार्यशाळा यांना पालकांची उपस्थिती आवश्यक राहिल.
5) पालक वाचनालयाचा लाभ पालकांनी घ्यावा.
6) मुलांच्या विकासाविषयी शाळेचा विचार आणि भूमिका समजून घेऊन शाळेला सहकार्य करावे.
7) शाळा अनुदानित असल्यामुळे खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे शुल्क भरावे.
सोमवार ते शुक्रवार - दुपारी 12:20 ते 5:40
आणि
शनिवार - सकाळी 8:40 ते 12:30
सोमवार ते शुक्रवार - दुपारी 12:20 ते 5:40
आणि
शनिवार - सकाळी 10:30 ते 3:30
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वयोमानाप्रमाणे यथोचित वर्गात प्रवेश देण्यात येईल.