1999 साली संस्थेने पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर काळाची गरज म्हणून कला, क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसायमार्गदर्शन, समुपदेशन, शैक्षणिक संशोधन, सेवांतर्गत प्रशिक्षण अशा कामांचा विस्तार करण्याचाही निर्णय घेतला.
संस्थेच्या सुरू असलेल्या आणि नियोजित उपक्रमांमध्ये समन्वय व सुसूत्रता राखण्यासाठी एक शैक्षणिक संकुल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवालीबेन मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, दानशूर श्री. मफतलाल मोहनलाल मेहता (काकाजी) यांनी त्या ट्रस्ट मार्फत 31 लाख रुपयांची देणगी दिली. संस्थेच्या संकुलाचे 'फैबा विमलाबेन कोठारी शैक्षणिक संकुल' असे नामकरण करण्यात आले. संकुलाचे उद्घाटन दिनांक 14-11-2000 रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. श्री. अरुण गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.