मुलाबद्दल प्रेम असेल तर……….

मुलाबद्दल प्रेम असेल तर……….
तर त्याला
त्याच्या डोळ्यांनी पाहू दे,
त्याच्या कानाने ऐकू दे,
त्याचे शब्द बोलू दे,
त्याच्या पायांनी चालू दे,
त्याच्या मनाने अनुभवू दे,
त्याच्या हाताने काम करू दे.

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेतले स्वातंत्र्य बालकाला मिळावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न या शाळेत केले जातात. बालविहार या शब्दातच हा सर्व अर्थ सामावलेला आहे. मुलाला मोकळा विहार म्हणजेच स्वछंद बागडायला मिळेल अशी जागा. आपले घर- कुटुंब हेच विश्व असणारे तीन वर्षांचे मूल जेव्हा शाळेत प्रवेश करते तेव्हा त्याचा वेगळ्या वातावरणाशी पहिल्यांदाच संबंध येतो. म्हणून या वातावरणात मोकळेपणा, आपुलकी असणं त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. असे वातावरण इथे बालकाला उपलब्ध करून दिले जाते. अशा मोकळ्या वातावरणातच त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची पूर्वतयारीही करून घेतली जाते. दैनंदिन नियोजनात हस्त नेत्र समन्वय, स्नायूंचा विकास, अवकाशीय बुद्धिमत्ता, सामाजिक, भावनिक, सांगीतिक विकास, भाषा विकास, तार्किक विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या वर्गकृतींचा समावेश केला जातो.


आमची ओळख

सर बैरामजी जीजीभॉय यांनी 1942 साली देणगी म्हणून दिलेल्या भूखंडावरील इमारतीत अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, ही माध्यमिक शाळा 1998 पर्यंत भरत होती. सन 1999 पासून तेथे बालवाडी भरते. संस्थेची बालवाडी आणि प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी बैराम एन्. जीजीभॉय यांनी 10 लाख रुपयांची देणगी दिली. देणगीदारांच्या इच्छेनुसार नव्याने सुरू होणाऱ्या बालवाडी आणि प्राथमिक शाळांचे नामकरण अनुक्रमे ‘डोसीबाई जीजीभॉय बालविहार’ आणि ‘डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा’ असे झाले.
बालवाडीतील मुलांचा विविध अंगानी विकास होण्यासाठी त्यांच्या वयाला अनुरुप अशा खेळांची व्यवस्था वर्गांमध्ये तसेच मैदानात केलेली आहे. या खेळांची आखणी करताना मुलांच्या सुरक्षिततेचा आवर्जून विचार केला जातो.

१९९९ साली संस्थेने डोसीबाई जीजीभॉय बालवाडी सुरू केली.त्यावेळी बालवाडीत शिशुगट व बालगट असे दोन गट होते. परंतू २१जानेवारी २०१५ रोजी शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबतचा सरकारचा जीआर आला त्यानुसार शिशुगट व बालगट अशा दोन गटांमध्ये चालणारी बालवाडी छोटा शिशुगट, मोठा शिशुगट आणि बालगट अशा तीन गटांमध्ये जून २०१५पासून सुरु झाली.
१८ ते २० मुलांसाठी एक शिक्षिका हे प्रमाण आहे.


परिसर आणि सुविधा

बालवाडीतील मुलांचा विविध अंगानी विकास होण्यासाठी त्यांच्या वयाला अनुरुप अशा खेळांची व्यवस्था वर्गांमध्ये तसेच मैदानात केलेली आहे.
या खेळांची आखणी करताना मुलांच्या सुरक्षिततेचा आवर्जून विचार केला जातो.


शिक्षक


सुप्रिया राणे
मुख्याध्यापिका


सुचित्रा कोठारे
सहा. शिक्षिका



श्रद्धा रहाटे
सहा. शिक्षिका



सोनाली सोमजी
सहा. शिक्षिका



संपदा नार्वेकर
सहा. शिक्षिका



मनीषा घावरे
सहा. शिक्षिका


शिक्षकेतर कर्मचारी


दिप्ती जडयार
सेविका

रेश्मा दायते
सेविका
child porno child porno astropay astropay