आपला सहभाग


आपण प्रत्यक्ष कामात सहभाग देऊ शकता.

मंडळाच्या तीनही शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. कामांचा आवाका लक्षात घेता शिक्षकांव्यतिरिक्त विविध विषयात रूची असणाऱ्या आणि एखादे विशेष कौशल्य मिळवलेल्या हितचिंतकांची मदत यासाठी लागत असते. अशी मदत करण्यासाठी शाळांमध्ये वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींचा एक मदतगट आहे. माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, पालक, हितचिंंतक अशा वेगवेगळ्या नात्याने संस्थेशी जोडलेल्या स्नेहींचा असा हा मदतगट आहे. हे सर्वजण संस्थेची भूमिका, विचार समजून घेऊन निश्चित स्वरूपाचे सहकार्य करत असतात. त्यासाठी अपेक्षित ठरावीक असा वेळ देतात.
विद्यार्थ्यांच्या सहलीला तसेच क्षेत्रभेटींना शिक्षकांच्या सोबत जाणे, मुलांसाठी खाऊ तयार करणे, स्पर्धा स्नेहसंमेलन, खेळदिन, दुकानजत्रा, रात्रशिबिर अशा शालेय कार्यक्रमांच्या तयारीसाठी मदतीला येणे, परीक्षांसाठी मुलांची तयारी करून घेणे, अभ्यासात मदत लागणाऱ्या मुलांना शिकवणे, शैक्षणिक साधने तयार करण्यात शिक्षकांना मदत करणे, शालांत परीक्षा दिलेल्या मुलांना मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्यासोबत आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करणे, ऑनलाईन प्रवेशासाठी मदत, तंत्रज्ञानासंदर्भात लागणारी मदत,
अशा स्वरुपाची मदत करण्यास आपण इच्छुक असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.


आपण देणगी देऊन सहभाग देऊ शकता

दत्तक पालक योजना

प्राथमिक शाळेला शासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून अनुदान मिळू लागलेले नाही.
शाळेला प्रत्येक विद्यार्थ्यामागे मासिक 1500 रुपये खर्च येतो. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना इतकी फी भरणे परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. एका मुलासाठी वार्षिक 15000 (रुपये पंधरा हजार) या प्रमाणे रक्कम भरून आपल्याला पालकत्व स्वीकारता येईल.


इतर कारणांसाठी देणगी

आपण पुढीलपैकी कोणत्याही कायम निधीसाठी किंवा योजनेसाठी देणगी देऊन सहभागी होऊ शकता.


विद्यार्थी सहाय्य निधी

या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित गटांतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शूल्क, साहित्य खर्च, सहल इत्यादीसाठी अर्थसहाय्य केले जाते. (लक्ष्य: 100 लाख रुपये)


शिक्षणसुधार निधी

अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलला वीज, पाणी तसेच शालेय साधनसामग्रीसारख्या वेतनेतर खर्चांसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीला शासनाची परवानगी मिळत नसल्यामुळे संस्थेला स्वखर्चाने कर्मचाऱ्यांच्या नेमणूका कराव्या लागतात. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी मिळण्यास शासनाकडून विलंब होत असल्यामुळे संस्थेला स्वखर्चाने नेमणुका कराव्या लागतात. शासनाकडून इमारत भाडे मिळत नसल्यामुळे इमारतीची आवश्यक ती देखभाल करणे शक्य होत नाही. नियमांनुसार विद्यार्थ्यांकडून फी आकारता येत ही. त्यामुळे या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून हा सर्व खर्च भागविला जातो. (लक्ष्य: 150 लाख रुपये)


प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास निधी

या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून शिक्षकप्रशिक्षण, विविध शैक्षणिक प्रयोग व उपक्रम, अध्ययन व अध्यापनातील गुणवत्ता विकास, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, शिक्षकांना प्रोत्साहन, अशा कामांसाठी खर्च केला जातो. (लक्ष्य: 100 लाख रुपये)


क्रीडा विकास निधी

या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून क्रीडा साहित्याची खरेदी, प्रशिक्षक व सेवकांचे मानधन, शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा प्रवास, निवास व भोजनखर्च केला जातो. (लक्ष्य: 100 लाख रुपये)


ग्रंथमित्र निधी

या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून विद्यार्थी व शिक्षकांच्या ग्रंथालयासाठी संगणक, पुस्तके, सी.डीज् इत्यादीच्या खरेदीचा तसेच मुलांची पुस्तकांशी मैत्री होण्यासाठी आखलेल्या योजनांचा खर्च केला जातो. (लक्ष्य: 10 लाख रुपये)


देणगी संबंधी सूचना

देणगी धनादेशाने किंवा ‘ऑन लाईन ट्रानस्फर’ने स्वीकारली जाईल. धनादेश 'दि शिक्षण मंडळ, गोरेगाव' या नावाने काढावा. संस्थेला दिलेली देणगीची रक्कम आयकर अधिनियमच्या कलम 80/G अन्वये कर सवलतीस पात्र ठरते.


Important instructions for on-line transfers.

(1) As per the prevailing rules in India, The Shikshan Mandal, Goregaon has maintained two separate bank accounts for (i) donations received from abroad and (ii) donations received from within India.
(2) Donors are requested to contact us at smg1942@gmail.com giving details of his/her bank account. We will be pleased to furnish the details of appropriate bank account of SMG depending on the source of donation.
(3) The donors may then transfer the amount to such bank account and intimate us about it.
(4) Please also send the details of donations (name of the donor, address, PAN card no., cell phone number, amount, bank transfer details etc.) to the above email id.

child porno child porno astropay astropay