ONLINE प्रवेश --> "डोसीबाई जीजीभॉय बालविहार" आणि "अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल" (माहिती साठी क्लिक करा)

आमची ओळख

मुंबई जवळील गोरेगाव या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने 1940 साली संस्थेची स्थापना झाली. केवळ चार मुले व तीन मुलींना बरोबर घेऊन अंबाबाई देवस्थानच्या आवारात इयत्ता पाचवी म्हणजे तेव्हांच्या इंग्लिश पहिली पासून शाळा सुरू झाली. 1940 साली आद्यगुरुजी गोविंद पातकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आज एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.

संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय बालविहार (बालवाडी), डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा (1ली ते 4थी) आणि अ. भि. गोरेगोवकर इंग्लिश स्कूल (5वी ते 10वी), या तीन शाळांमधे मध्यम व निम्न आर्थिक स्तरातील 1400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 'कमला मफतलाल मेहता संगणक केंद्र', 'अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमी' आणि 'प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास', हे एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणारे केंद्र सुरू झाले आहे. मुलांना शिकवताना त्यांच्या शिक्षणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने समृध्द होण्यासाठी प्रयत्न करणे व विद्यार्थ्यांना समृध्द होण्यासाठी मदत करणे या उद्देशाने हे केंद्र काम करत आहे.

पुढे वाचा

वार्तापत्र

पुढे वाचा

पुस्तक प्रकाशन

दि शिक्षण मंडळ, गोरेगाव, अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, डोसीबाई जीजीभॉय बालविहार आणि प्राथमिक शाळा यांची वाटचाल सांगणारी दोन पुस्तकं 'शिकणारी शाळा - अभिरंग' आणि 'शिकणारी शाळा - बालरंग' ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाली आहेत. शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या लेखनाने समृद्ध झालेल्या या दोन पुस्तकांच्या संचाचे संपादन शाळेच्या माजी विद्यार्थिनी वैशाली रोडे यांनी केले आहे.

अमृत महोत्सव साजरा केलेल्या संस्थेचा आणि शाळेचा प्रवास, विविध टप्प्यांवर घेतलेली वळणे, निर्णय, अनुभव, पक्की होत गेलेली तत्वे, मिळवलेले यश-अपयश अशा बऱ्याच गोष्टींमुळे पुस्तकं वाचनीय झाली आहेत. शाळेच्या माजी तसेच आजी विद्यार्थ्यांनाही शाळेचा हा चेहरा वेगळ्या नजरेने न्याहाळायला नक्कीच आवडेल.

या संचाची मूळ किंमत ६५०/- रुपये आहे. तो सवलतीत ४०० रुपयांत (टपाल खर्च वेगळा) दि शिक्षण मंडळ गोरेगावच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

खरेदीसाठी संपर्क: तृप्ती आजगावकर - 9004433382 संदेश पवार - 9324257080

फोटो गॅलरी

child porno child porno astropay astropay