मुंबई जवळील गोरेगाव या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने 1940
साली संस्थेची स्थापना झाली. केवळ चार मुले व तीन मुलींना बरोबर घेऊन अंबाबाई देवस्थानच्या आवारात
इयत्ता पाचवी म्हणजे तेव्हांच्या इंग्लिश पहिली पासून शाळा सुरू झाली. 1940 साली आद्यगुरुजी गोविंद
पातकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आज एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.
संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय बालविहार (बालवाडी), डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा (1ली ते 4थी) आणि अ. भि.
गोरेगोवकर इंग्लिश स्कूल (5वी ते 10वी), या तीन शाळांमधे मध्यम व निम्न आर्थिक स्तरातील 1400 पेक्षा
जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 'कमला मफतलाल मेहता संगणक केंद्र', 'अ. भि. गोरेगावकर क्रीडा
अकादमी' आणि 'प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास', हे एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणारे
केंद्र सुरू झाले आहे. मुलांना शिकवताना त्यांच्या शिक्षणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या
सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने समृध्द होण्यासाठी प्रयत्न करणे व विद्यार्थ्यांना समृध्द होण्यासाठी
मदत करणे या उद्देशाने हे केंद्र काम करत आहे.
पुढे वाचा