प्रकल्प

इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘कंप्युटर मस्ती’ हा प्रोग्राम शिकवला जातो. ‘इनओपन टेक्नॉलॉजीज् आणि आयआयटी मुंबई’ यांनी संयुक्तपणे तयार केलेला हा प्रोग्राम आहे. याचे इयत्तेनुरुप स्तर केलेले आहेत. त्यासाठी मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर केला जातो. या अभ्यासक्रमात संगणकाचे भाग, तो सुरु आणि बंद करणे, तो वापरताना घ्यायची काळजी, कीबोर्डचा वापर, म्युझिक प्लेअरचा वापर, एडीटींग आणि प्रोसेसींग टेक्स्ट, ड्रॉइंग आणि पेंटब्रश अशा गोष्टींचा समावेश आहे.
इंग्रजी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी जून, 2015 पासून पुढील तीन वर्षांसाठी शाळेत सुजया फाऊंडेशनचा ‘सुजया इंग्लिश अॅक्टीव्ह लर्निंग’ हा प्रकल्प सुरु केला आहे. या संपूर्ण प्रकल्पात इंग्रजी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थी संगणकाचा वापर करतात. संगणकावर तयार असलेल्या सरावपत्रिका व चाचण्या सोडवतात. संगणकाद्वारे ध्वनीमुद्रित संभाषण ऐकून भाषा शिकतात. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या महत्त्वाच्या चार भाषिक कौशल्यांची पूर्तता संगणकाद्वारे करणारा हा प्रोग्राम आहे. हा प्रकल्प इ. 5 वी व 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गाला दररोज घड्याळी एक तास संगणक केंद्र उपलब्ध करून दिले जाते.
7 वी व 8 वीला संगणकाच्या तासाला स्वंतत्र अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्यानुसार संगणक हा विषय शिकवला जातो. या अभ्यासक्रमात एम्. एस, वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, इंटरनेट, मराठी, इंग्रजी टायपिंग अशा गोष्टींचा समावेश आहे.
9 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातच ‘माहिती संप्रेषण तंत्रज्ञान’ असा विषय आहे. त्याचे नियमित वर्ग संगणक केंद्रात घेतले जातात. या अभ्यासक्रमात नेमून दिलेले सर्व घटक विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
दैनंदिन अभ्यासक्रमातील शालेय प्रकल्प तसेच 15 ऑगस्टच्या वर्गप्रकल्पासाठीही विद्यार्थ्यांना संगणक आणि इंटरनेट वापरावयास दिले जातात. याव्यतिरिक्त केंद्रात पुढील काही उपक्रमही राबवले जातात.



सुटीतली शिबिरे


दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत इयत्ता 5 वी व 6 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आणि ऊन्हाळ्याच्या सुट्टीत इयत्ता 7 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘संगणकाशी मैत्री’ हे एक आठवड्याचे शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात एम्. एस्. वर्ड, टॅली, मराठी- इंग्रजी टायपिंग, इंटरनेट या गोष्टी शिकवल्या जातात.
ऊन्हाळी सुटीत एक महिन्याच्या कालावधीसाठी शिबिर आयोजित केले जाते. दररोज घड्याळी दोन तास अशी या शिबिराची वेळ असते. या शिबिरात डी. टी. पी. हा प्रोग्राम शिकवला जातो. यात कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेज मेकर यांसारखे घटक शिकवले जातात. या शिबिरात थिअरी ऐवजी प्रॅक्टीकलवर भर दिला जातो. हे शिबिर शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनाही खुले असते. या शिबिरांना मुलांची उपस्थिती उल्लेखनीय असते.


ऑनलाईन प्रवेश

शालान्त परीक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करायची असते. विद्यार्थ्यांना यासाठी संगणक केंद्र उपलब्ध करून दिले जाते. परिसरातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन प्रवेशासाठी हे संगणक केंद्र खुले करून दिले जाते. तसेच त्यासाठी मार्गदर्शनही केले जाते.


रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

विद्यामंदीर या संस्थेने चालविलेल्या रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना हे संगणक केंद्र विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. इ. 8 वी, 9 वीच्या वेळापत्रकात संगणकाची तासिका आहे. विद्यार्थी या तासिकेला संगणक केंद्रात येऊन अभ्यासक्रम ठरवल्याप्रमाणे शिकतात. संगणक केंद्राचे प्रशिक्षक त्यांना शिकवतात. याशिवाय शाळा भरण्यापूर्वी एक तास त्यांना संगणकातील जास्तीत जास्त प्रोग्राम्स शिकवण्याचा प्रयत्न केला जातो.

child porno child porno astropay astropay