उपक्रम

1940 मधे शाळा स्थापन झाल्यापासून येथे अनेक चांगल्या परंपरा रुजवल्या आणि जोपासल्या गेल्या. बदलत्या काळानुसार त्यांत काही बदल झाले आणि नवीन परंपराही सुरू झाल्या. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून येथे उपक्रम आयोजित केले जातात. आपल्या बोधचिन्हाला अनुसरून ज्ञानाबरोबर कला आणि क्रीडेलाही प्राधान्य दिले जाते.

स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम व प्रकल्पमांडणी


गेल्या सहा दशकांपासून ध्वजारोहणाचा मान इ. 9 वीतील गुणवंत विद्यार्थ्याला दिला जातो. याच दिवशी इ. 5 वी ते 10 वीचे सर्व विद्यार्थी स्वत: माहिती गोळा करून विविध विषयांवर गटवार प्रकल्प मांडतात. प्रतिकृती, चित्र, लेखन अशा विविध माध्यमांतून प्रकल्पाच्या विषयांची मांडणी केली जाते. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि अंगभूत गुणांना, कौशल्याला संधी मिळते. माजी विद्यार्थी आणि पालक आवर्जून प्रकल्प पाहायला येतात. गेली दोन वर्षे विद्यार्थी इंग्लिशमधूनसुद्धा निवेदन करून विषयांची माहिती देतात.



प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम व कलामहोत्सव


शाळेच्या क्रीडामहोत्सवात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला या दिवशी ध्वजारोहणाचा बहुमान मिळतो. क्रीडामहोत्सवात पहिल्या तीन क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्णपदक, रजत पदक आणि कांस्यपदक दिले जाते. शैक्षणिक वर्षात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विशेष सहभाग दिलेल्या खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे दिली जातात. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कलेच्या कामाचे प्रदर्शन मांडले जाते. हे कलाप्रदर्शन पालक तसेच माजी विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले जाते.



विविध दिन


मराठीदिन, शिक्षक दिन, पर्यावरण दिन, विज्ञान दिन, भूगोल दिन साजरे केले जातात. थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथी दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते.


हरित सेना

हा उपक्रम इ. 7 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती, भाज्या, फुलझाडे यांची लागवड तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी करता येणारे विशेष प्रयत्न असे काही उपक्रम आयोजित केले जातात.


रामन विज्ञान मंडळ

सन 1989 मध्ये शाळेने रामन विज्ञान मंडळ सुरु केले. इ. 8 वी व 9 वीतील इच्छुक विद्यार्थी मंडळाचे सभासद होऊ शकतात. मंडळातर्फे गिरीभ्रमण, अवकाश अभ्यास, आकाशनिरीक्षण, पक्षीनिरीक्षण, वर्षासहल, निसर्गप्रेमींशी गप्पा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बी. एन्. एच्. एस्., ग्रीन लाईन मुंबई यासारख्या संस्थांतर्फे सर्पमित्र, नाते मैत्रिचे असे कार्यक्रम केले जातात. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षात 4 ते 5 कार्यक्रम होतात.


ग्रंथ-मित्र योजना

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ही योजना सुरु केली आहे. जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या, त्याविषयी आपले मत मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके दिली जातात.


मुलांचे हस्तलिखित

विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रतिभेला वाव देणारा हा उपक्रम आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांनी विविध निमित्ताने केलेले लेखन, काव्य, चित्र रेखाटने, इ. ची एकत्रित बांधणी करून हस्तलिखित तयार केले जाते. इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताचे नाव ‘अंकुर’ तर इ. 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताचे ‘विकास’ असे नाव आहे.


इंग्रजीसाठी विशेष प्रयत्न


शाळा मराठी माध्यमाची असली तरीही काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी शाळेत विशेष प्रयत्न केले जातात. या अनुषंगाने इंग्रजी भाषेवर काम करणाऱ्या सुजया फाउंडेशन या संस्थेबरोबर काम सुरु केले आहे. शालेय तासिकांमध्येच संगणकाच्या मदतीने इंग्रजीचे अध्ययन - अध्यापन केले जाते. या प्रकल्पासाठी संगणक कक्षातील 43 संगणकांवर त्यांचा प्रोग्राम अपलोड करून घेतलेला आहे. इंग्रजीच्या कामात मदत करण्यासाठी निवृत्त शिक्षक आणि काही शिक्षणप्रेमी नियमितपणे येतात. शिक्षकांनी स्वत: इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवावे, यासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात.


सक्रिय जनगणित प्रकल्प


गणितावर काम करण्याची विशेष गरज भासत असल्यामुळे शाळेने या विषयात मूलभूत काम करणाऱ्या नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन या संस्थेबरोबर सक्रिय जनगणित प्रकल्प (Universal Active Math) हाती घेतला आहे. विद्यार्थी साधनांच्या मदतीने समजून गणित शिकतील, असा या तीन वर्षांच्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. इ. 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसोबत हे काम सुरु आहे.


अभ्यासात मदत लागणाऱ्या मुलांसोबत काम


काही वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे वरच्या वर्गांतील मुलांनाही लिहिण्या-वाचण्यात गंभीर स्वरुपाच्या अडचणी असल्याचे आढळून येते. अशा मुलांना विशेष मदत दिली जाते. शिकण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना नियमित प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच अशा मुलांना शिकवण्यासाठी गरजेनुसार कोणकोणत्या पद्धती वापरता येतील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.


गायन वर्ग

इयत्ता 5 वी व 6 वीला शालेय वेळापत्रकातील आठवड्यातून एक तासिका गायनाची असते. आठवड्यातून एकदा संध्याकाळी एक तास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी गाण्याचे विशेष वर्ग घेतले जातात. हे वर्ग आठवड्यातून एकदा असतात.


क्रीडा


विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्या खेळाचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात कौशल्य मिळवावे, यासाठी शाळेत विशेष प्रयत्न केले जातात. शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव वैयक्तिक आणि सांघिक क्रीडाप्रकार, अशा दोन टप्प्यात पार पडतो.
सलग तीन दिवस चालणाऱ्या वैयक्तिक क्रीडामहोत्सवात धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, बटाटा शर्यत अशा वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यात भाग घेणाऱ्या खेळाडूंची गटवार विभागणी ‘कॅलिफोर्निया सारणी पद्धतीने’ म्हणजेच खेळाडू विद्यार्थ्यांची इयत्ता किंवा वय हे निकष न धरता त्यांचे वजन आणि उंची नुसार केली जाते. वार्षिक सांघिक खेळांचे सामनेही सलग तीन दिवस रंगतात. यात मुला - मुलींच्या कबड्डी, खो-खो, लंगडी, व्हॉली-बॉल या खेळांचा समावेश असतो.
क्रीडाक्षेत्रात सर्वांगाने काम करता यावे यासाठी अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमीची स्थापना केली आहे. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, कराटे आणि स्केटींग या खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची व्यवस्था आहे. अकादमीतर्फे सुट्ट्यांमध्ये क्रीडा शिबिरे आयोजित केली जातात. खिलाडू वृत्तीचे चांगले खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यक असे पोषक वातावरण मुलांना इथे मिळते.
शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधीत्व करतात. पार्ला ट्रॉफी आणि प्रबोधन यांसारख्या खाजगी संस्थांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सांघिक तसेच अॅथलेटीक्स स्पर्धांमध्येही विद्यार्थी सहभाग घेतात आणि यशही मिळवतात.



सेतू शिबीर


परिसरातील वेगवेगळ्या प्राथमिक शाळांमधून इयत्ता पाचवीत विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात. त्याचबरोबर संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतून 40 ते 45 मुले प्रवेश घेतात. ही सर्व मुले आपआपल्या प्राथमिक शाळेतून विविध अनुभव घेऊन इथे येतात. त्यांची एकमेकांशी आणि शाळेशी ओळख व्हावी आणि त्यांना एका समान टप्प्यावर आणावे, या हेतूने शाळा सुरू होण्यापूर्वी चार दिवसांच्या सेतू शिबिराची आखणी केली जाते. मुलांना विविध अनुभव दिले जातात. त्यांत प्रथमत: त्यांच्या विशिष्ट भाषिक क्षमता, कौशल्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टीं वेगवेगळ्या पद्धतीने तपासल्या जातात. त्यामुळे पुढील वर्षभरात विद्यार्थ्यांसोबत गरजेनुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करता येते. शिक्षणप्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटू नये यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे जास्तीची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना संधींची उपलब्धताही करून दिली जाते.


सहली


दरवर्षी सर्व इयत्तांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सहली आयोजित केल्या जातात. यात ऐतिहासिक स्थळे, वास्तू, संग्रहालये, आश्रम अशा ठिकाणांचा समावेश असतो. सहलींचा कालावधी इयत्तेनुरुप वेगवेगळा असतो.


विविध स्पर्धा परीक्षा

स्वत:च्या क्षमता आजमावता याव्यात, त्यांचा कस लागावा आणि स्पर्धायुगाला सामोरे जाण्याची तयारी व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या स्पर्धापरीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान मंच परीक्षा, ज्यूनियर ऑलिंपियाड, नॅशनल सायन्स एक्झाम, डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा, इन्स्पायर अॅवॉर्डस्, चित्रकला ग्रेड परीक्षा, गणित संबोध परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना ( NMMS इ. 8 वी), NTS (इ.10वी) अशा काही परीक्षांचा त्यांत समावेश असतो.
शाळेतील शिक्षक आणि संबंधित विषयातील जाणकार व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. माजी विद्यार्थीसुद्धा शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.


विविध कौशल्यपूरक स्पर्धा


विद्यार्थ्यांना आपल्या अंगभूत कलागुणांची ओळख शालेय जीवनात होत असते. शाळेत नियमितपणे वादविवाद, वक्तृत्व, काव्यगायन, काव्यलेखन, हस्ताक्षर, रांगोळी, निबंध, चित्रकला या सारख्या अनेकविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे कलागुण विकसित होण्याची संधी या स्पर्धांमुळे मिळते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा म्हणून प्रयत्न केले जातात.


शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या आंतरशालेय स्पर्धां

शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या समूहगान, लोकनृत्य, वाद्यसंगीत, वक्तृत्व, प्रश्न मंजुषा, निबंध लेखन तसेच विभागीय विज्ञान प्रदर्शने अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी नियमित सहभाग घेतात.


वार्षिक बक्षिस समारंभ


शैक्षणिक वर्षभरात शाळेत विविध स्पर्धा होत असतात. विद्यार्थी त्यात भाग घेतात, यश मिळवतात. अशा सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रितपणे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी म्हणजे वार्षिक बक्षिक समारंभ. या समारंभाला आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न असतो.

child porno child porno astropay astropay