उपक्रम

शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांना शिकण्याच्या अनेकविध संधी उपलब्ध होतात. यात प्रत्येक मुलाचा सहभाग असतो. एकमेकांची बलस्थानं आणि आवडीनुसार ते कामाची जबाबदारी वाटून घेतात. परस्पर सहकार्याने उपक्रम यशस्वीरित्या पार पाडतात.


आमची दुकानजत्रा



‘दुकानजत्रा’ म्हणजे गणिती संकल्पनांचा अनुभव घेण्याची संधी. वर्गात शिकलेल्या कर्ज, भांडवल, मापन या संकल्पनांचे उपयोजन दुकानजत्रेत होते. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यापासूनच याची तयारी सुरु होते. विक्रीच्या वस्तूंपासून त्यांची किंमत ठरवण्यापर्यंतचे सर्व निर्णय मुलं घेतात. शिक्षण मंडळाकडून काही रक्कम कर्जाऊ घेतली जाते. इ.1ली ते 4थीच्या मुलांनी कलेच्या तासिकेला बनवलेल्या कागदी पिशव्या, भरतकामाचे रूमाल, बुकमार्कस्, शाडूची माती, भाषिक खेळ विक्रीसाठी ठेवले जातात. जाहिराती लिहिण्यापासून ते दुकानाची मांडणी, सजावट याची व्यवस्था मुले करतात. इ.1ली ते 3रीची मुले 20 ते 50 रु.पर्यंतच्या वस्तू 4 थीच्या दुकानदारांकडून खरेदी करतात. इ. 4थीची मुले हिशोब करून नफ्यातून शाळेसाठी काय खरेदी करायचे ते सुचवतात.





आमचे स्नेहसंमेलन




सादरीकरणाच्या विविध अंगांचा अनुभव मुले स्नेहसंमेलनात घेतात. पाऊस, गोष्टी, प्राणी, रंग या मुलांच्या भावविश्वातील विषयांची निवड करून तो विषय नाट्य, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून मांडला जातो. मुले त्या विषयाचे वाचन अनुभव, संवाद, कवितालेखन करतात. त्यांची आवड, वृत्ती, क्षमता यांचा विचार करून प्रत्येक मुलाला यात सहभागी करून घेतले जाते. पालक व मुलांच्या मदतीने विनाखर्चिक पण समर्पक अशी वेशभूषा, रंगभूषा केली जाते. विविध भाषांचा वापर स्नेहसंमेलनात केला जातो. जूनमध्येच विषय जाहीर केल्याने कला व दैनंदिन तासिकांच्या नियोजनात स्नेहसंमेलनाचे घटक अंतर्भूत केले जातात.
रंगमंच सजावट, नेपथ्य, संवादलेखन, सादरीकरण या अंगांविषयी शिक्षक जाणकार व्यक्तींकडून माहिती घेतात.




मुलाखती


परिसरातील वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या कामाबद्दल मुलांच्या मनात कुतुहल असते. त्यामुळे पोस्टमन, भाजीवाले, शाळेचे सेवक, संस्थेचे पदाधिकारी. . . अशा व्यावसायिकांना आणि व्यक्तिंना शाळेत गप्पा करायला बोलावले जाते. ते मुलांशी संवाद साधतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. त्यांच्याकडे असलेले कौशल्य, त्यासाठी करावे लागणारे श्रम, याविषयी माहिती देतात. अशा मुलाखतींमुळे श्रमप्रतिष्ठेसारखा संस्कार नकळत मुलांच्या मनावर होतो. वेगवेगळ्या उद्योगांची, व्यवसायांची माहिती मिळते.


आमचा खेळदिन



मैदान ही मुलांची अत्यंत आवडीची जागा. शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला लंगडी, धावणे, उंचउडी, लांबउडी तसेच भोवरा, सागरगोटे अशासारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. खेळदिन हा वर्षातला असा एक दिवस ज्या दिवशी या सर्व खेळांची एकत्रित मांडणी केली जाते आणि प्रत्येक मूल प्रत्येक खेळ खेळते. निकोप स्पर्धेचा अनुभव मुले घेतात. सर्व मुलांचे पालकांच्या हस्ते पदके देऊन कौतुक केले जाते. शाळेच्या विस्तीर्ण मैदानाला कदमतालाने फेरी मारून सुरुवात केलेल्या या खेळदिनाची सांगता मानवी मनोऱ्यांच्या सादरीकरणाने होते.



रात्रशिबिर



इ. 4थीच्या मुलांना जिव्हाळ्याचा वाटणारा कार्यक्रम म्हणजे रात्रशिबिर. प्राथमिक शाळेचा निरोप घेताना मुले एक रात्र शाळेत राहतात. एकत्र खेळतात, जेवतात, उशीरापर्यंत जागतात आणि झोपतात. शाळेकडून भेट म्हणून त्यांना वर्गफोटो आणि गोष्टीचे पुस्तक दिले जाते. त्यांना भावतील व कायम लक्षात राहतील असे अनुभव विचारपूर्वक या दिवशी दिले जातात. सर्वच गोष्टींचा मुले मनमुराद आनंद लुटतात आणि शाळेविषयीच्या तरल आठवणी मनात साठवून सकाळी घरी परततात.


आमच्या शाळेच्या सहली



इ.1 ली, 2 रीच्या मुलांना बागेत खेळणे आवडते. प्रवास करून दूर जाण्यापेक्षा परिसरातील त्यांच्या आवडीचे खेळ उपलब्ध असणाऱ्या बागेत सहल जाते. इ. 3 री व 4 थीच्या मुलांची सहल अभ्यासक्रमाशी जोडलेल्या ठिकाणी जाते. जसे अश्मयुगाशी संबंधित चर्चगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, आणि वनस्पती व कीटकांचे अद्भुत जग पाहण्यासाठी गोरेगावातील बी.एन्.एच्.एस्. ही ठिकाणे. अशा ठिकाणचा प्रवास पालकांच्या मदतीने सार्वजनिक वाहनांनी माफक खर्चात केला जातो. त्यामुळे मुलांना शहर आणि वाहतूक व्यवस्था अशा गोष्टी कळतात.


भाषाशिबिर

मराठी आणि इंग्रजीसाठी प्रत्येक सत्रात चार दिवसांचे भाषाशिबिर आयोजित केले जाते. संपूर्ण शाळेत भाषिक वातावरण तयार करण्यासाठी विशिष्ट मांडणी केली जाते. शिबिरादरम्यान मुलांच्या श्रवण, वाचन, संभाषण व लेखन या भाषिक कौशल्यांवर भर दिला जातो. भाषेची मजा अनुभवता यावी, शब्दसंग्रह वाढावा यासाठी भाषिक खेळ घेतले जातात. मुले या शिबिरात चित्रपुस्तके, शब्दकोडी, Riddles, Recipe books तयार करतात. अनुभव लेखन करतात. हे साहित्य पालकांना बघण्यासाठी, वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.


आमची क्षेत्रभेटी



‘अनुभवातून शिक्षण’ हा शिक्षणविचार शाळेने स्वीकारलेला आहे. मुलांनी परिसरातील पोस्ट ऑफिस, बॅंक, धोबीघाट, भाजीमंडई, माध्यमिक शाळा अशा ठिकाणांना भेटी देऊन तिथे चालणाऱ्या कामाची व्यवस्था प्रत्यक्ष पाहावी, समजून घ्यावी म्हणून या क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.


शाळेतील सण व उत्सव



शाळेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांसोबत रक्षाबंधन, संक्रांत, ईद, रंगपंचमी, गणेशोत्सव, नाताळ यांसारखे सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. हे सण साजरे करताना त्यांचा ऋतूंशी, आरोग्याशी, विज्ञानाशी असलेला संबंध यांची मुलांबरोबर चर्चा केली जाते.
निसर्गातील घटकांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. साधेपणाने पण मजा घेत सर्व सण - उत्सव साजरे करता येतात; अशी दृष्टी या निमित्ताने मुलांना देण्याचा प्रयत्न केला जातो.


प्रदर्शन

प्रदर्शनाचा विषय जूनमध्येच जाहीर केला जातो. आपली पृथ्वी, पाणी वापरूया जपून, वाहतूक व्यवस्था यासारखे विषय असतात. त्यांची गणित, भूगोल, विज्ञान, भाषा, कला या सर्व अभ्यास विषयांशी सांगड घालून मांडणी केली जाते. त्यासाठी इ. 3 री, 4 थीची मुले विषयाचा अभ्यास करतात. या निमित्ताने मुलांना निरीक्षण, अनुभव व कृतीतून शिकण्याची संधी मिळते. चित्र, प्रतिकृती, आलेख, नकाशे, प्रयोग या दृश्य माध्यमातून विषय सादर करण्याचे कौशल्य विकसित होते. प्रदर्शनात मांडावयच्या सर्व गोष्टी मुले उपलब्ध साहित्य वापरून कल्पकतेने तयार करतात. मुलांच्या सृजनशिलतेला वाव देणारा हा उपक्रम आहे.

child porno child porno astropay astropay