आमची ओळख

मुंबई जवळील गोरेगाव या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने 1940 साली संस्थेची स्थापना झाली. केवळ चार मुले व तीन मुलींना बरोबर घेऊन अंबाबाई देवस्थानच्या आवारात इयत्ता पाचवी म्हणजे तेव्हांच्या इंग्लिश पहिली पासून शाळा सुरू झाली. 1940 साली आद्यगुरुजी गोविंद पातकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आज एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.

संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय बालविहार (बालवाडी), डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा (1ली ते 4थी) आणि अ. भि. गोरेगोवकर इंग्लिश स्कूल (5वी ते 10वी), या तीन शाळांमधे मध्यम व निम्न आर्थिक स्तरातील 1400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 'कमला मफतलाल मेहता संगणक केंद्र', 'अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमी' आणि 'प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास', हे एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणारे केंद्र सुरू झाले आहे. मुलांना शिकवताना त्यांच्या शिक्षणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने समृध्द होण्यासाठी प्रयत्न करणे व विद्यार्थ्यांना समृध्द होण्यासाठी मदत करणे या उद्देशाने हे केंद्र काम करत आहे.

पुढे वाचा

वार्तापत्र

पुढे वाचा

अमृत महोत्सव

1940 साली कै. पातकर गुरूजींनी अंबाबाई देवस्थानाच्या व्हरांड्यात सात विद्यार्थ्यांना घेऊन इयत्ता पाचवी पासून शाळा सुरू केली. 18 ऑक्टोबर 1942 रोजी दसऱ्याच्या दिवशी शाळा आपल्या स्वतःच्या इमारतीत विसावली आणि शाळेचे नामकरण झाले, ‘अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ’. या छोट्या रोपट्याचे आता भव्य वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच्या अवतीभवती पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा तसेच इतर काही केंद्रांची रोपटी रुजली आहेत. मंडळाच्या या तीनही शाळांमधे आता 1300 पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. दि शिक्षण मंडळ, गोरेगाव आणि अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल दिनांक 18 ऑक्टोबर 2016 रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यासंबंधी आपल्याला माहिती देण्यासाठी हे पत्र.

पुढे वाचा

फोटो गॅलरी

child porno child porno astropay astropay